मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. महापौर, मुंबई
मा. आयुक्त, मुंबई महानगरपालिका
मा. अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका
मा. जनसंपर्क अधिकारी, मुंबई महानगरपालिका
मा. संचालक, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग
मुंबई महानगरपालिका
यांस,
विषय - आपत्कालीन विभागाच्या, पावसाच्या प्रेस नोट सर्व पत्रकारांना मिळण्याबाबत
महोदय / महोदया,
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभगामार्फतगेले कित्तेक वर्षे पावसाच्या संदर्भात प्रेस नोट काढण्यात येत असल्या तरी या प्रेस नोट पालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या मार्फत सर्व पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना मिळत होत्या. परंतू या वर्षा पासून पावसाच्या प्रेस नोट फक्त आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून काही मोजक्या पत्रकारांना इमेल वर पाठवल्या जात आहेत असे समजते. आपत्कालीन विभागाकडून देण्यात येणाऱ्या प्रेस नोट या काही मोजक्याच पत्रकारांना मिळत असल्याने काही मोजक्या वृत्तपत्रांच्या वाचकांपर्यंतच पावसाची व आपतकालीन व्यवस्थापन विभागाची माहिती पोहचत आहे.
प्रत्तेक वृत्तपत्राचा एक विशिष्ट असा वाचक वर्ग असतो. यामुळे काही मोजकी वृत्तपत्र प्रत्तेक मुंबईकर नागरिकान पर्यंत पोहचत नाहीत याची कृपया नोंद घेण्याची गरज आहे. मुंबईकर नागरिकान पर्यंत पालिकेला खरोखरच माहिती पोहोचवायची असल्यास सर्व वृत्तपत्राच्या पत्रकारांना माहिती मिळणे गरेजेचे आहे. परंतू असे पालिकेकडून होत नसल्याचे दिसत आहे.
तरी आपत्कालीन स्थिती आणि पावसाच्या स्थिती संदर्भात मिळणाऱ्या प्रेस नोट पालिकेतील जनसंपर्क विभागाकडे नोंद असलेल्या सर्व पत्रकारांना मिळाव्यात यासाठी आपत्कालीन विभागाला तसे आदेश द्यावेत, हि विनंती.
आपला,
अजेयकुमार जाधव
सरचिटणीस
मुंबई महानगर पालिका पत्रकार संघ
संलग्न
जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र (रजि.)
प्रत रवाना -
जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र (रजि.)
मुंबई - दिनांक ११ जुलै २०१४